पोर्ट्रेट, नाइट व्ह्यू, टाइम लॅप्स आणि सिनेमॅटिक ब्लर यांसारखी वैशिष्ट्ये वापरून अप्रतिम फोटो व व्हिडिओ घ्या आणि पूर्णपणे पुन्हा डिझाइन केलेल्या Pixel कॅमेरा सोबत एकही क्षण चुकवू नका.
आकर्षक फोटो घ्या
• एक्स्पोझर आणि व्हाइट बॅलन्स नियंत्रणे यांसह HDR+ - अप्रतिम फोटो घेण्यासाठी, HDR+ वापरून, विशेषतः कमी प्रकाशात किंवा बॅकलिट दृश्यांमध्ये अद्भुत फोटो काढा.
• नाइट व्ह्यू - तुम्हाला पुन्हा कधीच तुमचा फ्लॅश वापरण्याची आवश्यकता वाटणार नाही. नाइट व्ह्यू हे अंधारामुळे लपले जाणारे फोटोमधील बारकावे आणि रंग टिपण्यात मदत करते. ॲस्ट्रोफोटोग्राफी वापरून तुम्ही अगदी आकाशगंगेचेदेखील फोटो काढू शकता!
• सुपर रिझोल्युशन झूम - लांबून झूम करूनदेखील शार्प फोटो घ्या. सुपर रिझोल्युशन झूम हे तुम्ही झूम इन केल्यावर तुमचे फोटो आणखी शार्प करते.
• लॉंग एक्स्पोझर - दृश्यातील हलणार्या गोष्टींना आकर्षक ब्लर जोडते
• ॲक्शन पॅन - तुमचा सब्जेक्ट फोकसमध्ये ठेवून बॅकग्राउंडमध्ये आकर्षक ब्लर जोडते
• मॅक्रो फोकस - लहान सब्जेक्टमध्येदेखील व्हिव्हिड रंग आणि स्ट्राइकिंग कॉंट्रास्ट
प्रत्येकवेळी अद्भुत व्हिडिओ
• गर्दी असलेल्या, कमी प्रकाश असलेल्या ठिकाणीदेखील आकर्षक रिझोल्यूशन व स्पष्ट ऑडिओसह विनाअडथळा व्हिडिओ रेकॉर्ड करा
• सिनेमॅटिक ब्लर - तुमच्या सब्जेक्टची बॅकग्राउंड ब्लर करून सिनेमॅटिक इफेक्ट तयार करते
• सिनेमॅटिक पॅन - तुमच्या फोनच्या पॅन करतानाच्या हालचाली धीम्या करते
• लाँग शॉट - डीफॉल्ट फोटो मोडमध्ये शटर की सहज दाबून ठेवून, त्वरित व्हिडिओ काढते
Pixel 8 Pro खास वैशिष्ट्ये
• 50MP उच्च रेझोल्यूशन - आणखी चांगल्या तपशिलांसह उच्च रेझोल्यूशन फोटो घ्या
• Pro नियंत्रणे - फोकस, शटर स्पीड आणि आणखी बरेच काही अॅडजस्ट करण्याच्या क्षमतेसह आणखी क्रीएटिव्ह नियंत्रण घ्या
आवश्यकता
- Pixel कॅमेरा ची नवीनतम आवृत्ती ही फक्त Android 14 व त्यावरील आवृत्त्या रन करणाऱ्या Pixel डिव्हाइसवर काम करते. Wear OS साठी Pixel कॅमेरा ची नवीनतम आवृत्ती फक्त Pixel फोनशी कनेक्ट केलेल्या Wear OS 3 (आणि त्यावरील आवृत्त्या) डिव्हाइसवर काम करते. काही वैशिष्ट्ये सर्व डिव्हाइसवर उपलब्ध नाहीत.